Mauli College of Education, Wadala स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

*वडाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
 वडाळा : श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित शिक्षण संकुलाचा एकत्रित रित्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला. न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, माऊली मतिमंद विद्यालय, माऊली महाविद्यालय, माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा या चारही शिक्षण संकुलाचा एकत्रित ध्वजारोहणाचा कार्यक्रम न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडाळा या ठिकाणी एकत्रित रित्या करण्यात आला. *लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री बळीराम (काका) साठे* यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध शिक्षण संकुलातून बाहेर पडलेल्या आणि प्रमुख ठिकाणी कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदरणीय श्री काकासाहेब साठे यांनी देशाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला. सोलापूर शहराचा इतिहास सांगून येत्या भविष्यकाळात सोलापूर शहर आय.टी.तंत्रज्ञान युक्त होणार आहे. याची कल्पना विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य कसे उज्वल होणार आहे याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्र (बाबा) बळीराम साठे, सचिव- राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त श्री दत्तात्रय गायकवाड गुरुजी, संचालक श्री सुरेश साठे, मुख्याध्यापिका डॉ.वैशाली साठे, प्राचार्य डॉ.दत्तात्रय हरवाळकर, प्राचार्य डॉ.नागेश सर्वदे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर, संस्थेतील विविध पदाधिकारी व वडाळा ग्रामपंचायत, वडाळा येथील सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय मोकाशी सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पाटील सर यांनी मानले.

Popular posts from this blog

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.),वडाळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन( बी.एड् .), वडाळा व्यवस्थापन कोटा प्रवेश - बी.एड्. प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष २०२२-२३