माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन,वडाळा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा....
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा महाविद्यालयामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 2023 वार रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवजन्म पाळणा सादर केला. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक डॉ.प्रदीप जगताप - प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर यांचे "लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.डॉ.प्रदीप जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या बाबी पुस्तकाव्यतिरिक्त आहेत, ज्या बाबी विद्यार्थ्यांना माहीत नाहीत अशा बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहास वर्णनात्मक न अभ्यासता इतिहास विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यासल्यास खरा कळतो.शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरिता कोणकोणत्या कल्याणकारी योजना त्या कालावधीमध्ये राबविल्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराज जनतेचे राजे कशाप्रकारे होते.याविषयी आपल्या भाषणातून त्यांनी माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नागेश दत्तात्रय सर्वदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु यांच्यामधील असणारे संबंध विषयी कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालय प्रशिक्षणार्थी श्री संदेश मोरे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी श्री सुरज मोरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी पूजा गणेशकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभाार प्रदर्शन प्राध्यापक राजीव त्रिंबक निकम यांनी केले.