Mauli College of Education (B.Ed.),Wadala महापरिनिर्वाण दिन साजरा
माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.),वडाळा
तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर
आज ०६ डिसेंबर २०२२ वार मंगळवार रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागेश दत्तात्रय सर्वदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. महाविद्यालयातील सर्व स्टाफ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, समाजातील दुर्लक्षित गटांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य याची मोजणी कोणत्याही स्वरूपात करता येत नसून देश आणि जगातील सर्व देशांना एक आदर्श लोकशाही कशाप्रकारे यशस्वीरित्या भारत देशामध्ये नांदत आहे ते केवळ भारतीय संविधानामुळे भारतीय संविधानाचे लेखन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. यावेळी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री विजय तोडकरी, श्री विजय केकडे ,श्री राजीव निकम ,श्री दिलीप जमदाडे प्राध्यापिका आम्रपाली सर्वगोड, मनीषा वांगीकर, प्राजक्ता गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक स्वरूपात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होतेे.