माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा 2010 बॅच विद्यार्थी स्नेह मेळावा.

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.), वडाळा 
तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर  ४१३२२
अंतर्गत गुणवत्ता विभाग अंतर्गत (IQAC) 
दिनांक २७/११/२०२२ वार रविवार रोजी महाविद्यालयांमध्ये "माजी विद्यार्थी स्नेह मेळावा" आयोजित करण्यात आला. यावेळी सन २०१० मधील बी.एड्. प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये "वृक्षारोपणाचा कार्यक्रम" ठेवला होता. विद्यार्थी स्नेह मेळावा याकरिता श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा या संस्थेचे मार्गदर्शक प्रेरणास्थान. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री बळीराम (काका) साठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश दत्तात्रय सर्वदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री केदारीनाथ सुरवसे सर माजी प्राध्यापिका स्मिता मोहोळकर मॅडम यादेखील उपस्थित होत्या.
         आदरणीय बळीराम (काका) साठे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या  आवारा मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सोबत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या न्याक संदर्भात चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बी.एड. मध्येे. मिळालेल्या ज्ञानाचा जीवनात कसा उपयोग होतो याचे अनुभवातून कथन केले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री केदारनाथ सुरवसे सर यांनी काळाप्रमाणे समाजामध्ये बदल झाला पाहिजे. तो बदल शिक्षक घडवू शकतो. जात, धर्म, पंथ यामध्ये न अडकता मानवता हीच सेवा म्हणून कार्य करत रहा आणि तसे विद्यार्थी घडवत रहा असा संदेश सर्व माझी विद्यार्थी शिक्षकांना आणि आम्हा सर्वांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेश सर्वदे  यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजतागायत महाविद्यालयाचा विकासाचा आलेख विद्यार्थ्यांना सांगितला. महाविद्यालयाची प्रगती, महाविद्यालयाचा दरवर्षी असणारा परीक्षेचा शंभर टक्के निकाल, महाविद्यालयाकरता माझी विद्यार्थ्यांच्या मदतीची गरज कशी आहे याची सर्वांना माहिती दिली. यावेळी सन 2010 बॅच मधील अनेक विद्यार्थी उपस्थित राहिले होते. माजी विद्यार्थी मेळावा आयोजन करण्यापासून तो यशस्वी करण्यापर्यंत श्री महादेव सोनटक्के, श्री विशाल देशमुख श्री अतुल गोंडाळ या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री प्रवीण साठे यांनी सर्व आजी-माजी विद्यार्थी शिक्षकांचे आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयात कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक  उपस्थित होते. 

Popular posts from this blog

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.),वडाळा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

शैक्षणिक वर्ष 2023 - 24, बी.एड्.प्रथम वर्ष प्रवेश.... माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन, वडाळा

माऊली कॉलेज ऑफ एज्युकेशन( बी.एड् .), वडाळा व्यवस्थापन कोटा प्रवेश - बी.एड्. प्रथम वर्ष शैक्षणिक वर्ष २०२२-२३